रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी वरणगावात हल्लाबोल आंदोलन

वाटल्यास आमचे पदे काढा मात्र गाड्यांना थांबे द्या : सुनील काळे


Harlabol agitation in Varangaon to get the railway trains stopped वरणगाव (17 ऑक्टोबर 2024) : वरणगाव रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वीच्या थांबाणार्‍या रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी वरणगावकरांच्या वतीने प्रवासी संघटना, वरणगाव शहर फाउंडेशन व वरणगाव दिव्यांग आघाडीच्या वतीने रेल रोकोचे आयोजन करण्यात आले. आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले व रेल्वे अधिकार्‍यांना यावेळी खडे बोल माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सुनावले.

या मागण्यांसाठी आंदोलन
अप-डाऊन सेवाग्राम व सुरत-अमरावती एक्सप्रेस तसेच सायंकाळच्या पॅसेंजर गाड्यांचा थांबा कोरोना काळापासून बंद झाल्यामुळे वरणगावकरांची गैरसोय होत आहे. बंद झालेल्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात तसेच वरणगाव रेल्वे स्थानकावर अमरावती-पुणे, अजमेर, साईनगर शिर्डी, महाराष्ट्र डाऊन एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच मेमूच्या फेर्‍या वाढवण्यात याव्या, सिद्धेश्वर नगर येथे जाण्यासाठी अंडर बायपास पूल तयार करावा, बोदवड येथे जाण्यासाठी नागेश्वर मंदिराजवळ उड्डाणपूल तयार करावा, वरणगाव रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरू करावी, आचेगावला मेमूला थांबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

रेल्वे प्रशासनाकडे मांडल्या भावना
डीआरएम प्रतिनिधी प्रवीण साळुंके तसेच आरपीएफ कर्मचारी उपस्थित होते. वरणगाव पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी चोख बंदोबस्त राखला. आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष सुनील काळे, अशोक श्रीखंडे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, शामराव धनगर, भाजपाचे अध्यक्ष सुनील माळी, दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष सुनील शेट्टी, सविता माळी, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, नगरसेविका माला मेंढे, डॉ.प्रवीण चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, फजल शेख, अजमल खान, हितेश चौधरी, रमेश पालवे, गजानन वंजारी, योगेश माळी, आकाश निमकर, डॉ.सादिक फहीम, शेख कदिर सेठ, सुधाकर बावणे, कृष्णा महाजन, राहुल जंजाळे, शाबांनाबी खान, कलाबाई माळी, महेंद्र सैतवाल, शंकर पवार, पप्पू कोळी, मंगेश चौधर आदींसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर राजीनामे घ्या मात्र थांबे सुरू करा
एक्स्प्रेस गाड्यांना थांबा न दिल्यास आंदोलन अधिक धीव करणार असून जिथपर्यंत गाड्या वरणगावात थांबत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही हवे तर आमचे पद काढा मात्र आमच्या वरणगावकरांवर अन्याय करू नका, असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यावेळी म्हणाले.


कॉपी करू नका.