बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी रावेरात रास्ता रोको आंदोलन
रावेर (19 ऑक्टोबर 2024) : संघर्ष समितीतर्फे बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजवावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वाहनधारकांना मोठा मनस्ताप यामुळे सोसावा लागला.
यांचा आंदोलनात सहभाग
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील नवीन विश्रामगृहात जवळ शुक्रवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा ते पाऊण तास आंदोलन चालले.

या मागण्यांसाठी आंदोलन
रावेर शहरातून जाणार्या बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे रस्त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने झाली नाही ती त्वरित करावी तसेच शेतकर्यांना पंतप्रधान केळी पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना सुमारे एक वर्षांपासून थकबाकी मिळालेली नसल्याने ती त्वरित मिळावी तसेच जुना सावदा रोडवरील नागझरी नदीवरील पुलाचे काम सुरू आहे मात्र या नदीवर पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पर्यायी रस्ता त्वरित करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. संबंधितांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.




