भरधाव कार उलटली : धुळे जिल्ह्यातील दोघे ठार, 2 गंभीर !

पारोळा तालुक्यातील विचखेड्याजवळ रस्त्यापासून 500 फूटापर्यंत घसरली कार !


पारोळा (19 ऑक्टोबर 2024) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विचखेडे गावाजवळ धुळ्याकडे जाणार्‍या स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला सुमारे 500 फूट कार फेकली गेली अन् चार वेळा उलटली. या दुर्दैवी अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसर्‍या जखमीला धुळे येथे घेऊन जात असताना वाटतेतच त्यांचाही मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना 17 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.

असा घडला अपघात
पारोळ्याकडून धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कार (एम.एच.19, सी.एफ. 1190) ने धुळे जिल्ह्यातील तरवाडे येथील नीलेश सुरेश पाटील (25), गोविंद भास्कर राठोड (26), राहुल भाऊसाहेब अहिरे (24) जात असताना पारोळा तालुक्यातील विचखेड्याजवळ अपघात झाला. कार मोंढाळे प्र.अ. येथील महेश आत्माराम देवरे-पाटील (24) हे धुळ्याकडे नेत असताना विचखेडा गावाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या कार चालकाचा ताबा सुटल्याने ही कार रोडच्या कडेला जाऊन चार वेळा उलटली. त्यानंतर 500 फुटावर जावून ही कार थांबली.

या दुर्दैवी अपघातात राहुल यांचा जागीच मृत्यू झाला तर नीलेश पाटील यांना धुळे येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. तर कारमधील महेश देवरे, गोविंदा वंजारी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना 108 रुग्णावाहिकेसह महामार्गाची रुग्णवाहिका 1033 व नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. यातील गोविंदा वंजारी हे गंभीर जखमी असल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.