धुळे तालुक्यातील तीन गुन्हेगार हद्दपार : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ


Three criminals from Dhule taluka deported: Excitement in criminal circles धुळे (20 ऑक्टोबर 2024) : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या तीन उपद्रवींना धुळे जिल्ह्यासह चार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तीनही संशयीत धुळे तालुक्यातील रहिवासी आहेत. धुळे प्रांताधिकार्‍यांनी या संदर्भातील आदेश पारीत केले आहेत. विशाल दिलीप पाटील (रा.फागणे, ता.धुळे), तुषार विठ्ठल बोडरे (रा.नेर, ता.धुळे) व रोहन सखाराम थोरात (रा.अंबोडे ता.धुळे) अशी हद्दपार संशयीतांची नावे आहेत.

गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील संशयीतांचे उपद्रव मूल्य पाहता त्यांना हद्दपार करण्याबाबत धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांविरुध्द पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, अनिल महाजन, नितीन चव्हाण, मनोज बाविस्कर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम वर्ष 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) प्रमाणे हद्दपार प्रस्ताव तयार करून ते उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला.

धुळे उपविभागीय दंडाधिकारी यांनी विशाल पाटील व तुषार बोडरे या दोघांना धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तर रोहन थोरात यास धुळे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.


कॉपी करू नका.