नंदुरबारमध्ये हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा : मालकासह चौघांना अटक


Nandurbar raid on hotel prostitution business : Four arrested including owner नंदुरबार (20 ऑक्टोबर 2024) : नंदुरबार उपनगर पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकत तिघांना ताब्यात घेतले. यावेळी पश्चिम बंगाल व इतर भागातील मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून यात तीन जण हे नाशिकचे आहे.

या संशयीतांना अटक
अटक करण्यात आलेल्यांमध्ये हॅाटेल मालक संजय ब्रिजलाल चौधरी (45, रा.नंदुरबार), योगेश कैलास अभाडे (40, पठारे, ता.सिन्नर), मंगेश अशोकराव शेजूळ (34, गोपाळ नगर नाशिक), महेश पांडूरंग काळवांडे (37, नाशिक), महेश पांडुरंग काळवांडे अमृतधाम, नाशिक यांचा समावेश आहे. यावेळी तीन पीडीतांची सुटका करण्यात आली.

पोलिसांना तीन इसम काही महिलांसोबत हॅाटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार उपनगर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, एपीआय संजोग बच्छाव, राजेंद्र दाभाडे, विपूल पाटील, कमलाकर चौरे, गणेशा गावीत आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.