पाण्याच्या मोटारी लांबवणारे संशयीत धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात


धुळे (20 ऑक्टोबर 2024) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पाण्याच्या मोटारी लांबवणार्‍या दोन संशयीतांना अटक केली. राज भावडू कोळी (20) व राहुल संजय भील (20, दोन्ही रामी, ता.शिंदखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून 68 हजार रुपये किंमतीजच्या पाच पाण्याच्या मोटारी जप्त करण्यात आल्या.

गोपनीय माहितीवरून कारवाई
प्रियदर्शन काशीनाथ बागले (ब्राह्मणे, ता.शिंदखेडा) यांच्या ब्राह्मणे शिवारातून शेतातील इलेक्ट्रीक मोटार चोरीला गेल्यानंतर दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेला चोरट्यांची माहिती मिळताच त्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या व त्यांनी चोरी केलेल्या पाच मोटारी काढून दिल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाईधुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, अमित माळी, संजय पाटील, सचिन गोमसाळे, दिनेश परदेशी, चेतन बोरसे, विनायक खैरनार, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.