शिरपूर तालुक्यात 37 लाखांचा गांजा जप्त

आयजी पथकासह शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई ः त्रिकूटाविरोधात गुन्हा


Cannabis worth 37 lakhs seized in Shirpur taluka शिरपूर (20 ऑक्टोबर 2024) : शिरपूर तालुक्यात गांजाच्या शेतीवर संयुक्त कारवाईत यंत्रणेने कारवाईचा बुलडोजर फिरवत तब्बल 37 लाख 50 हजार रुपये किंमतीचा एकूण 1500 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरोात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पसार झाले आहेत. नाशिक आयजींच्या पथकासह शिरपूर तालुका पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्यातील भोईटी शिवारात गांजा शेती होत असल्याची माहिती नाशिक आयजी दत्तात्रय कराळे यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. आयजींच्या पथकासह शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात पथकाने छापेमारी करीत एक हजार पाचशे किलो वजनाचा व 37 लाख 50 हजार रुपये किेंमतीचा ओला गांजा जप्त करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा
संशयीत जगन गुलाब पावरा (भोईटी), दिलीप भावसिंग पावरा (भोईटी) व लाला सोमज्या पावरा (अमरिशनगर) यांच्याविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे तसेच आयजींच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, हवालदार विजय बिलघे, हवालदार प्रमोद मंडलिक, हवालदार विक्रांत मांगडे, चालक सुरेश टोंगारे, शिरपूर तालुक्याचे उपनिरीक्षक सुनील वसावे, मिलिंद पवार, सागर ठाकूर, रोहिदास पावरा, सुनील पवार, मिलिंद पवार, सागर ठाकूर, रोहिदास पावरा, सुनील पावरा, धनराज गोपाळ, चालक मनोज पाटील, चालक सागर कासार आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.