भुसावळ विधानसभेच्या आखाड्यात आमदार सावकारेंना चौथ्यांना तिकीट : भाजपेयींनी केला जल्लोष

शहरभर फटाक्यांची आतषबाजी : कार्यकर्त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात नृत्य


भुसावळ (21 ऑक्टोबर 2024) : भारतीय जनता पक्षाने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची यादी जारी केल्यानंतर पहिल्याच यादीत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना पुन्हा चौथ्यांदा संधी मिळाल्यानंतर भुसावळ शहर व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत जल्लोष केला. आमदार संजय सावकारे आगे बढोच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या तसेच विधानसभा निवडणुकीत आमदार सावकारेच विजयी होतील, असा विश्वासही यावेळी पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आला.

निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित : आमदार संजय सावकारे
पक्ष नेतृत्वाने आपल्यावर विश्वास टाकून सलग चौथ्यांदा आपल्याला तिकीट दिल्याने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. गेल्या 15 वषार्र्ंच्या काळात मतदारसंघात अनेक विकासकामे करण्यात आली. कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या बळावर आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असून मतदारांचे निश्चित आपल्याला आशीर्वाद लाभतील, असे भुसावळचे आमदार संजय सावकारे ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ शी बोलताना म्हणाले.


आमदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर जल्लोष
भुसावळ शहरातील सुरभी नगरातील आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाबाहेर भाजपा पदाधिकार्‍यांनी यावेळी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करीत जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आमदार संजय सावकारे आगे बढोंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या.

यांची होती उपस्थिती
जल्लोषप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगराध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, उद्योजक मनोज बियाणी, देवा वाणी, पुरूषोत्तम नारखेडे, राजेंद्र आवटे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, पिंटू ठाकूर, पिंटू कोठारी, किरण कोलते, बापू महाजन, अजय नागराणी, निकी बत्रा, माजी नगरसेवक अजय भोळे, नितीन धांडे, सुरजसिंग पाटील, वासुभाऊ बोंडे, नीळकंठ भारंबे,  अतुल झांबरे, भालचंद्र पाटील, राजेंद्र नाटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शहराध्यक्ष संतोष (दाढी) चौधरी, गुड्डू अग्रवाल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी  नगरसेवक आदी उपस्थित होते.

आमदार सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात
सलग तीन टर्म आमदार राहिलेले आमदार संजय सावकारे यंदा भाजपाने पुन्हा पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करीत  रिंगणात उतरवले. भाजपाचा उमेदवार जाहीर झाला असलातरी महाविकास आघाडीत मात्र अद्यापही उमेदवारीवर खल सुरू आहे.

शहरात भाजपाचा जल्लोष
आमदारांना तिकीट जाहीर होताच भुसावळातील आमदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर, अष्टभूजा चौक, बाजारपेठ पोलीस ठाणे, स्टेशन रोड, शिवाजी पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, वसंत टॉकीज तसेच जाम मोहल्ला, रजा टॉवर भागात, अमरदीप टॉकीजजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करून जल्लोष केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !