वंचित आघाडीकडून पाचवी यादी जाहीर : कुणा-कुणाला मिळाली संधी ?
मुंबई (21 ऑक्टोबर 2024) : वंचित आघाडीकडून सोमवारी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. वंचितने आज 16 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये हाय व्होल्टेज समजल्या जाणार्या बारामती विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. वंचितने बारामतीतून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे.
पाचव्या यादीत यांना मिळाली संधी

1. भुसावळ- जगन देवराम सोनवणे
2. मेहकर- डॉ. ऋतुजा चव्हाण
3. मूर्तिजापूर- सुगत वाघमारे
4. रिसोड- प्रशांत सुधीर गोळे
5. ओवळा माजीवडा- लोभर्सिग गणपतराव राठोड
6. ऐरोली- विक्रांत दयानंद चिकणे
7. जोगेश्वरी पूर्व- परमेश्वर रणशूर
8. दिंडोशी- राजेंद्र तानाजी ससाणे
9. मालाड- अजय आत्माराम रोकडे
10. अंधेरी पूर्व- अॅड. संजीवकुमार कलकोरी
11. घाटकोपर पश्चिम- सागर रमेश गवई
12. घाटकोपर पूर्व- सुनीता मायकवाड
13. चेंबूर- आनंद भीमराव जाधव
14. बारामती- मंगलदास तुकाराम निकाळजे
15. श्रीगोंदा- अण्णासाहेब शेलार
16. उदगीर- प्रा.डॉ.शिवाजीराव मरेप्पा देवनाळे




