मुक्ताईनगरातील उमेदवारीबाबत मुख्यमंत्रीच संभ्रमात ! : आमदार एकनाथराव खडसेंची टीका


The Chief Minister is confused about the candidacy in Muktainagar! : Criticism of MLA Eknathrao Khadse जळगाव (22 ऑक्टोबर 2024) : राज्यात सर्वाधिक चुरशीची सामना मुक्ताईनगरात रंगणार असून त्यातच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगरात आल्यानंतर त्यांनी महायुतीचा मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मेळाव्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी टिकेचे बाण चालवत मुख्यमंत्र्यांना मुक्ताईनगरात तीन वेळा यावे लागते म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा मतदार संघ कमकुवत आहे. उमेदवार आहे मात्र तो कोणत्या पक्षाचा आहे? कोणत्या चिन्हावर मतदान करायचे आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही. मुख्यमंत्रीच अजूनही संभ्रमात आहेत, असेदेखील आमदार खडसे म्हणाले.

वाढत्या महागाईबाबत मुख्यमंत्र्यांची चुप्पी
आमदार खडसे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगरात महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन केले मात्र उमेदवार कोणत्या पक्षाकडून किंवा कोणत्या चिन्हावर लढणार आहे ? कोणत्या चिन्हावर मतदान करावे मुख्यमंत्रीच संभ्रमात आहे. ते कोणत्या पक्षाचे आहे हे स्पष्ट करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्याचे मात्र ते करू शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी वाढलेल्या महागाईबद्दल कुठलेही भाष्य केले नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकरी शेतमजूर किंवा सर्वसामान्य जो या महागाईमध्ये होरपळतोय त्याच्याशी काही घेणे देणे नाही.

पाच हजार कोटींचे कामे कुठे झाली ?
मुख्यमंत्र्यांनी पाच हजार कोटींची कामे केले मात्र पाच हजार कोटींची कामे या मतदारसंघात केली कुठे ! असा प्रश्नही त्यांनी केला. कोणत्याही योजना सुरू झाल्या त्या बंद होत नाही हे सरकार आधीच दिवाळखोर झाले आहे. आठ लाख कोटींचे कर्ज या सरकारवर आहे. अधिक कर्ज काढा आणि योजना द्या, माझ्या शेतकर्‍याच्या मालाला भाव द्या. लाडक्या बहिणी योजनेला आमचा आक्षेप नाही आमचा आक्षेप वाढत्या महागाईला व शेतकर्‍यांच्या मालाला भाव न मिळण्यावर असल्याचेही आमदार खडसे म्हणाले.

 


कॉपी करू नका.