इनोव्हात सापडली पाच कोटींची रोकड : विधानसभा निवडणुकीत पोलिसांची कारवाई


5 Crore cash found in Innova : Police action during assembly elections पुणे (22 ऑक्टोबर 2024) : आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करताना पोलिसांनी तपासणीदरम्यान एका वाहनातून तब्बल पाच कोटींवर रक्कम जप्त केल्याने खळबळ उडाली. राजगड पोलिसांनी सोमवारी दुपार खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ ही कारवाई केली. वाहन सांगोला मतदारसंघात जात असताना पोलिसांनी इनोव्हा (एम.एच.25 एस.2526) ही अमोल शहाजीराव नलवडे यांची कार जप्त केली.

चौघे ताब्यात
राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला व सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनांची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहन पोलिस चौकीला आणून त्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली. तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.


कॉपी करू नका.