मुक्ताईनगरात जिल्हाधिकार्‍यांची भेट : मतदान प्रक्रियेचा आढावा


मुक्ताईनगर (22 ऑक्टोबर 2024) : मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी होणार्‍या मतदान प्रक्रियेसंबंधी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात भेट दिली. नामनिर्देशन कक्ष, आचारसंहिता कक्ष, मीडिया कक्ष, कंट्रोल रूम यांना भेट देऊन त्यांनी मार्गदर्शन करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.

यांची होती उपस्थिती
एस.एम.कॉलेज येथे नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोस्टमास्टर यांची बैठक घेऊन त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. मुक्ताईनगर निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे , मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे, बोदवड तहसीलदार वाणी तसेच सर्व नायब तहसीलदार उपस्थित होते.


कॉपी करू नका.