भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा

भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे यंदा नववे वर्ष


भुसावळ (22 ऑक्टोबर 2024) : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या-वस्त्यात दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी-वाटी फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नविन कपडे, नवीन चपला, बूट आणि शालेय साहित्य, किराणा गोळा करायचे. गरजू वस्त्या शोधायच्या आणि त्या ठिकाणी दिवाळी साजरी करायची असा हा उपक्रम आहे. यंदा उपक्रमाचे नववे वर्ष आहे. समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून अंतर्नाद प्रतिष्ठानने 2016 मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.

लसणीबर्डीत 30 ऑक्टोबरला  उपक्रम
यंदा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यातील लसणीबर्डी आदिवासी पाड्यावर 30 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरवासीयांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यंदा व्यापक स्वरूप देण्याचा मानस प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी व्यक्त केला आहे. ज्यांना शक्य नसेल पण देण्याचे सुख अनुभवायच असेल त्यांनी नवीन कपडे, जुने कपडे स्वच्छ धुवून व इस्त्री करून द्यावे. फराळ द्यायचा असेल तर उपक्रम समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख अमित चौधरी, समन्वयक समाधान जाधव,सह समन्वयक विक्रांत चौधरी, सह समन्वयक तेजेंद्र महाजन यांनी केले आहे.

जुने कपडे दान करण्याचे आवाहन
शहरवासीयांकडून मिळणार्‍या उत्तम प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, यंदा या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा मानस अंतर्नाद प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केला आहे. ज्यांना प्रत्यक्ष सहभाग घेणे शक्य नसेल, परंतु देण्याचे समाधान अनुभवायचे असेल, त्यांनी नवीन कपडे किंवा स्वच्छ धुतलेले व इस्त्री केलेले जुने कपडे दान करावेत. फराळ, शैक्षणिक साहित्य द्यायचे असल्यास, कृपया उपक्रम समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख अमित चौधरी, समन्वयक समाधान जाधव, सहसमन्वयक विक्रांत चौधरी आणि तेजेंद्र महाजन यांनी केले आहे.

उपक्रमासाठी समिती
ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, अमितकुमार पाटील, जीवन महाजन, डॉ.संजू भटकर, प्रसन्ना बोरोले, कुंदन वायकोळे, हितेंद्र नेमाडे, ललित महाजन, राजू वारके, भूषण झोपे, देव सरकटे, प्रा.डॉ.शामकुमार दुसाने, शैलेंद्र महाजन, राहुल भारंबे, उमेश फिरके, विपीन वारके, चंद्रकांत सूर्यवंशी, हरीश भट, जीवन सपकाळे, सचिन पाटील, निवृत्ती पाटील, प्रमोद पाटील, राजेंद्र जावळे, मंगेश भावे, केतन महाजन, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.

नवे जुने कपडे गोळा करणार
गतवर्षी या उपक्रमात फराळासह नवे आणि जुने कपडे गोळा करण्यात आले होते. ते जवळपास 450 व्यक्तींना वाटप करण्यात आले होते. सोबतच फराळ, नवीन चपला, शालेय साहित्य, साखर, तांदूळ सुद्धा वाटला होता. यंदा उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील शालेय दप्तर, स्वेटर , ब्लॅकेट असतील ते आणि इतर मदत प्रतिष्ठानच्या उपक्रम समितीकडे 26 ऑक्टोबर पर्यंत द्यावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख अमित चौधरी यांनी केले आहे.


कॉपी करू नका.