डिगंबर महाराज चिनावलकर मठ भव्य सभागृहाचे भूमिपूजन


Bhoomipujan of Digambar Maharaj Chinawalkar Math Grand Hall फैजपूर (22 ऑक्टोबर 2024): श्री क्षेत्र पंढरपूर येथे वै.डिगंबर महाराज मठाच्या प्रांगणात भव्य सभा मंडप उभारला जात आहे. त्याचे भूमिपूजन प.पू.प्रभाकर दादा बोधले अधिपती संत माणकोजी महाराज बोधले यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष नरेंद्र नारखेडे होते. सभा मंडपासाठी एक कोटींचा निधी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली. हे काम सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. कार्यक्रमास उपाध्यक्ष घनश्याम पाटील, मानद सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोले, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, विश्वस्त जयराम पाटील, त्र्यंबक चौधरी, अतुल तलेले, जनार्दन भारंबे, रमेश भंगाळे, मधुकर बोंडे, झेंडूजी महाराज बेळीकर मठ अध्यक्ष रमाकांत भारंबे, पंढरीनाथ पाटील, विकास पाटील, हर्षल महाराज खिर्डीकर, प्रमोद बढे, गिरीश वारके, ठेकेदार तेजस निकम, मयूर नारखेडे, अक्षय परदेशीसह भाविक व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.