महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आज यादी जाहीर होणार !


After the Mahavikas Aghadi meeting, the list will be announced today! मुंबई (22 ऑक्टोबर 2024) : महाविकास आघाडीची मंगळवारी सायंकाळी बैठक होत असून या बैठकीनंतर पहिली यादी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे भाजपाने 99 जागांवरील उमेदवार जाहीर केले तरी महाविकास आघाडीने मात्र अद्यापही यादी जाहीर केली नसल्याने इच्छूकांच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत ज्या जागांवर वाद नाही अशा जागांवरील निश्चित उमेदवारांना मात्र एबी फार्म वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.

सायंकाळी यादी येणार
महाविकास आघाडीतील काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची शक्यता असून त्यानंतर ठाकरे गट व राष्ट्रवादीला जागा मिळणार आहे. मंगळवारी दिवसभर काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक सुरू होती तर सायंकाळी महाविकास आघाडीनंतर पहिली यादी समोर येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर वाटणी निश्चित केले जाणार आहे.


कॉपी करू नका.