जळगाव कारागृहात कैद्याला मारहाण : पोलीस उपअधीक्षकांचा पदभार तडकाफडकी काढला


जळगाव  (22 ऑक्टोबर 2024) : खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असलेल्या ज्ञानेश्वर अभिमान पाटील 55, रा.वाघळी, ता.चाळीसगाव) यांना मारहाण झाल्यानंतर त्याची दखल विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी गंभीर दखल घेतली. प्रभारी उपअधीक्षक गजानन पाटील यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्याजागी नाशिक कारागृहाचे उपअधीक्षक सचिन चिकने यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

असे आहे प्रकरण
खुनाच्या गुन्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांना कारागृहातील हिवरकर नामक कर्मचारी व अन्य जणांनी 15 ऑक्टोबर रोजी बेदम मारहाण केल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या मारहाणीची दखल घेत उपअधीक्षक गजानन पाटील यांच्याकडील पदभार तडकाफडकी काढून घेतला आहे.

दोन दिवसांत अहवाल मागवला
या प्रकरणात जखमी पाटील यांच्यासह मारहाण करणारा हिवरकरसह अन्य कर्मचारी व उपअधीक्षक गजानन पाटील यांचाही जबाब घेण्यात आला. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटेज, उपचाराचे कागदपत्र मिळविण्यात आले आहे. दोन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होईल. या प्रकरणात कारवाई होणारच असल्याचे डॉ.सुपेकर यांनी स्पष्ट केले.

 


कॉपी करू नका.