100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
High Court granted bail to Sachin Vaze in 100 crore recovery case मुंबई (22 ऑक्टोबर 2024) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टाकडून जामीन मूंर करण्यात आला आहे मात्र सचिन वाझेविरोधात अन्य प्रकरणातही गुन्हा दाखल असल्याने त्याची तूर्तास तुरुंगातून सुटका होऊ शकणार नाही.
शंभर कोटी वसुलीचा होता आरोप
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला. याप्रकरणी देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यालाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या मात्र काही काळानंतर अनिल देशमुख यांची या प्रकरणात जामिनावर सुटका झाल. त्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मिळालेला असल्याने मलाही जामीन मिळावा, अशी मागणी करत वाझे याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. याप्रकरणी मंगळवारी कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
तूर्तास वाझेचा मुक्काम तुरूंगातच
दरम्यान, सचिन वाझे याच्यावर अँटेलिया स्फोटक प्रकरणातही गंभीर आरोप आहेत. याप्रकरणातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असून एनआयएकडून तपास सुरू आहे. त्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सचिन वाझे याला तुरुंगातच राहावं लागणार आहे.