शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर : मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील, धरणगावात गुलाबराव पाटील तर पारोळ्यात अमोल पाटील उमेदवार


मुंबई (23 ऑक्टोबर 2024) : शिवसेना शिंदे गटाने आपल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर करीत सस्पेन्स अखेर संपवला. भाजपाकडे असलेला मुक्ताईनगरचा मतदारसंघ आता शिंदे सेनेकडे गेला असून तेथे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना संधी मिळाली आहे तर धरणगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील तर पारोळ्यात आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना संधी मिळाली आहे. पाचोरा येथे विद्यमान आमदार किशोर आप्पा तर चोपड्यात चंद्रकांत सोनवणे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिंदे सेनेसोबत गेलेल्या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

मुक्ताईनगर शिंदे सेनेकडे
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात जागेवरील दावा भाजपाने सोडला नसल्याने ट्विस्ट वाढला होता मात्र मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार म्हणून ओळख असलेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांनाच ही जागा सोडण्यात आल्याने हा मतदारसंघ आता शिवसेना शिंदे गटाकडे आला आहे. उमेदवारी जाहीर होताच आमदार समर्थकांनी जल्लोष केला.


शिंदे गटातील या उमेदवारांना मिळाली संधी-

कोपरी पाचपाखाडी- एकनाथ शिंदे
साक्री- मंजुळाताई गावित
चोपडा चंद्रकांत सोनवणे
जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील
एरंडोल- अमोल चिमणराव पाटील
पाचोरा- किशोर पाटील
मुक्ताईनगर- चंद्रकांत पाटील
बुलढाणा- संजय गायकवाड
मेहकर- संजय रायमुलकर
दर्यापूर- अभिजीत आनंदराव अडसूळ
रामटेक- आशिष जैस्वाल
भंडारा- नरेंद्र भोंडेकर
दिग्रस- संजय राठोड
नांदेड उत्तर- बालाजी कल्याणकर
कळमनुरी- संतोष बांगर
जालना- अर्जून खोतकर
सिल्लोड- अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर मध्य- प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर पश्चिम- संजय शिरसाट
पैठण- विलास भुमरे
वैजापूर- रमेश बोरनारे
नांदगाव- सुहास कांदे
मालेगाव बाह्य- दादाजी भुसे
ओवळा माजिवडा- प्रताप सरनाईक
मागाठाणे- प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी पूर्व- मनीषा रवींद्र वायकर
चांदिवली- दिलीप भाऊसाहेब लांडे
कुर्ला- मंगेश कुडाळकर
माहिम- सदा सरवणकर
भायखळा- यामिनी जाधव
कर्जत- महेंद्र थोरवे
अलिबाग- महेंद्र हरी दळवी
महाड- भरतशेठ गोगावले
उमरगा- ज्ञानराज चौगुले
परांडा- तानाजी सावंत
सांगोला- शहाजी बापू पाटील
कोरेगाव- महेश शिंदे
पाटण – शंभूराज देसाई
दापोली- योगेश कदम
रत्नागिरी – उदय सामंत
राजापूर – किरण सामंत
सावंतवाडी – दीपक केसरकर
राधानगरी – प्रकाश आबिटकर
करवीर – चंद्रदीप नरके
खानापूर – सुहास बाबर







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !