मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दाखल केला अर्ज


Muktainagar MLA Chandrakant Patil filed the application मुक्ताईनगर (24 ऑक्टोबर 2024) : मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी महायुतीतील पदाधिकार्‍यांसोबत आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दुपारी 11.55 वाजेच्या सुमारास दाखल केला. शिवसेनेतील शिंदे गटाकडून आमदार पाटील यांना उमेदवारी अलीकडेच जाहीर झाली आहे. 2019 साली मुक्ताईनगरातून चंद्रकांत पाटील निवडून आले आहेत.

विरोधकांना अद्यापही एबी फार्म नाही
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणााले की, गेल्या पाच वर्षांमध्ये केलेली विकास कामे आणि जनतेचे प्रेम यावर मी भरघोस मताधिक्याने निवडून येईल’, असा विश्वास आहे. माझ्या विरोधकांना अजूनपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही, असा टोलाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !