अजित पवारांच्या घड्याळाची टीक टीक सुरू राहणार मात्र सुप्रीम कोर्ट म्हणाले….!
नवी दिल्ली (24 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असलातरी सुप्रीम कोर्टानं यापूर्वी दिलेल्या निर्देशांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आले आहे. कोर्टानं शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही निर्देशांचं पालन करा अन्यथा कोर्टाच्या अवमानाचा ठपका ठेऊ, असा इशाराच दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
तर अवमानला ठपका
सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना निर्देशांचं पालन करा असा इशारा दिला. जर या निर्देशांचं पालन केलं नाहीतर आम्ही अवमानाचा ठपका ठेवू, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. तुम्ही दोघांनीही तुम्हाला दिलेले निर्देश पाळले पाहिजेत. जर मुद्दाम निर्देशांचं उल्लंघण कोणी केलं तर आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू, आम्ही स्वतःहून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं पालन केल्याचं प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू, असं आश्वासन यावेळी अजित पवारांनी कोर्टाला दिलं.
अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा दिल्यानं विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. मात्र, अजित पवार यांना प्रत्येक ठिकाणी ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’ असा मजकूर लिहावा लागणार आहे. अजित पवार यांना शरद पवार यांनी दाखल केलेल्या अर्जावर आणि कोर्टाच्या निर्देशावर प्रतिज्ञा पत्र द्यावे लागेल.