राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर : मुक्ताईनगरात अॅड.रोहिणी खडसेंना उमेदवारी जाहीर
जामनेरात दिलीप खोडपे तर धरणगावात गुलाबराव देवकरांना संधी
मुंबई (24 ऑक्टोबर 2024) :चर्चेच्या अनेक वाटाघाटीनंतर गुरुवारी ायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. मुक्ताईनगरातून आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात इस्लामपूरमधून जयंत पाटील, काटोलमधून अनिल देशमुख, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख नावांचा समावेश आहे.
जामनेरात खोडपे तर धरणगावात गुलाबराव देवकरांना संधी
जामनेरात मंत्री गिरीश महाजनांविरोधात दिलीप खोडपे तर धरणगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आहे. मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात अॅड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


असे आहेत मतदारसंघ निहाय उमेदवार
जयंत पाटील- इस्लामपूर
अनिल देशमुख – काटोल
राजेश टोपे – घनसांगवी
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
शशिकांत शिंदे – गोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
प्राजक्त तनपुरे – राहुरी
अशोकराव पवार – शिरुर
मानसिंगराव नाईक – शिराळा
सुनील भुसारा – विक्रमगड
रोहित पवार – कर्जत जामखेड
विनायकराव पाटील – अहमदपूर
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
सुधाकर भालेराव – उदगीर
चंद्रकांत दानवे – भोकरदन
प्रदीप नाईक – किनवट
विजय भांबळे – जिंतूर
पृथ्वीराज साठे -केज
संदीप नाईक – बेलापूर
पुसाहेब पठारे – वडगाव शेरी
दिलीप घोडपे – जामनेर
रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे – मूर्तीजापूर
दिनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
रविकांत गोपचे – तिरोडा
भाग्यश्री आत्राम – अहेरी
रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी – बदनापूर
सुभाष पवार – मुरबाड
राखी जाधव – घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम – आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वरपे – कोपरगाव
प्रताप ढाकणे – शेवगाव
राणी लंके -पारनेर
मेहबूब शेख – आष्टी
नारायण पाटील – करमाळा
महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव – चिपळूण
समरजित घाटगे – कागल
रोहित आर. पाटील – तासगाव कवठेमहांकाळ
प्रशांत जगताप -हडपसर




