रावेर विधानसभेतून काँग्रेसतर्फे धनंजय चौधरींना उमेदवारी
काँग्रेसची 25 विद्यमान आमदारांना संधी ; 48 जणांची पहिली यादी जाहीर
Dhananjay Chaudhary nominated by Congress from Raver Legislative Assembly मुंबई (25 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 48 जणांची पहिली उमेदवारी जादी जाहीर केली असून त्यात रावेर विधानसभेसाठी आमदार शिरीष चौधरी यांचे पूत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. धनंजय चौधरी यांच्या माध्यमातून या परिवारातील चौथी पिढी आता निवडणूक रिंगणात आहे. भाजपातर्फे अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस येथे कुणाला संधी देणार ? याकडे लक्ष लागून असताना धनंजय चौधरी यांना काँग्रेसने उमेदवारी देत अनेक बाबींवर सस्पेन्स हटवला आहे.
25 विद्यमान आमदारांना संधी
काँग्रेसने पहिल्या यादीत भाजपमधून प्रवेश केलेल्या दोन जणांना उमेदवारी दिली तर 25 विद्यमान आमदारांचा यादीत समावेश आहे.

असे आहे काँग्रेसचे उमेदवार, कंसात मतदारसंघ
नाना पटोले- (साकोली) प्रदेशाध्यक्ष
बाळासाहेब थोरात- (संगमनेर) विद्यमान आमदार
विजय वड्डेटीवार- (ब्रह्मपुरी) विरोधी पक्षनेते
पृथ्वीराज चव्हाण- (कराड दक्षिण) विद्यमान आमदार
मुझ्झफर हुसेन- (मीरा भाईंदर) माजी आमदार
अस्लम शेख- (मालाड पश्चिम) विद्यमान आमदार
नसीम खान- (चांदीवली) माजी आमदार
ज्योती गायकवाड- (धारावी) खासदार बहीण
अमिन पटेल- (मुंबादेवी) विद्यमान आमदार
अमित देशमुख- (लातूर शहर) विद्यमान आमदार
विश्वजित कदम- (पलुस-कडेगाव) विद्यमान आमदार
धीरज देशमुख- (लातूर ग्रामीण) विद्यमान आमदार
के.सी.पाडवी- (अक्कलकुवा) विद्यमान आमदार
राजेंद्रकुमार गावीत- (शहादा) भाजपमधून प्रवेश
किरण तडवी- (नंदुरबार) नवीन चेहरा
शिरीषकुमार नाईक- (नवापूर) विद्यमान आमदार
प्रवीण चौरे- (साक्री) नवीन चेहरा
कुणाल पाटील- (धुळे ग्रामीण) विद्यमान आमदार
अॅड.धनंजय चौधरी- (रावेर) माजी आमदार पुत्र
राजेश एकडक- (मलकापूर) विद्यमान आमदार
राहुल बोंद्रे- (चिखली) माजी आमदार
अमित झनक- (रिसोड) आमदार
प्रा.विरेंद्र जगताप- (धामणगाव रेल्वे) माजी आमदार
डॉ. सुनील देशमुख- (अमरावती) भाजपमधून प्रवेश
अॅड.यशोमती ठाकूर- (तिवसा) विद्यमान आमदार
बबलुभाऊ देशमुख (अचलपूर)
रणजित कांबळे (देवळी) विद्यमान आमदार
प्रफुल गुडधे (नागपूर दक्षिण पश्चिम)
बंटी शेळके (नागपूर मध्य)
विकास ठाकरे नागपूर पश्चिम विद्यमान आमदार
डॉ. नितीन राऊत नागपूर उत्तर विद्यमान आमदार
गोपालदास अगरवाल (गोंदिया) माजी आमदार
सुभाष धोत्रे (राजूरा) विद्यमान आमदार
सतीश वारुजकर (चिमूर)
माधवराव पाटील (हदगाव) विद्यमान आमदार
तिरुपती कोंडेकर (भोकर) नवीन चेहरा
मीनल पाटील (खतगावकर) नायगाव
सुरेश वरपुडकर (पाथरी) विद्यमान आमदार
विकास औताडे (फुलंब्री)
संजय जगताप (पुरंदर) विद्यमान आमदार
संग्राम थोपटे (भोर) विद्यमान आमदार
रवींद्र धंगेकर (कसबा पेठ) विद्यमान आमदार
प्रभावती घोगरे (शिर्डी) नवीन चेहरा
सिद्धराम मेहत्रे (अक्कलकोट) माजी आमदार
ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण) विद्यमान आमदार
राहुल पाटील (करवीर) माजी आमदार पुत्र
राजू आवळे (हातकणंगले) विद्यमान आमदार
विक्रमसिंह सावंत (जत) विद्यमान आमदार




