वराडसीम गणातील सर्व गावे पोकरा योजनेपासून वंचित
परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप
All the villages of Varadseem Gana deprived of Pokra Yojana भुसावळ (25 ऑक्टोबर 2024) : नुकतीच पोकरा योजना राबविण्यासाठी गावांची निवड झाली. त्यात भुसावळ तालुक्यातील खेडी बुद्रूक, कन्हाळे बुद्रूक, कन्हाळे खुर्द, कुर्हेपानाचे, भिलमळी, मांडवेदिगर, किन्ही, खंडाळे, मोंढाळे, शिंदी, आचेगाव, पिंपळगाव अशा 12 गावांचा समावेश करण्यात आला आहे. भुसावळकडून जामनेरकडे जाणार्या जामनेर रोडच्या पश्चिमेकडील एकही गाव या यादीत नसल्याने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
एकही गाव पोकरा योजनेत नाही
पंचायत समितीच्या वराडसीम-सुनसगाव गणात एकही गाव पोकरा योजनेत बसलेले नाही कारण या गावांना पाणलोट विकासमध्ये सहभागी करण्यात आले आहे. या परिसरातील काही गावांमध्ये शासनाची मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सामाजिक वणीकरण, लघू पाटबंधारे (स्थानिक स्तर ) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा ही योजना राबविण्यात आली होती. जलसंधारण विभागाच्या पाणलोट विकास योजनेंतर्गत एक कार्यकारणी गठीत करण्यात आली होती व योजना राबविण्यास सुरवात झाली होती मात्र योजना बंद करण्यात आली. याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती कोणीही शासनाला कळवण्यात आली नाही हे विशेष. या योजनेंतर्गत तयार केलेली वस्तू जसे पाणी टँकर, कार्यालयीन वस्तू आजही ठिकाणावर नाहीत यामुळे शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तेल व तूपही गेले
पाणलोट योजनेचा फटका या वराडसीम-सुनसगाव गणातील गावांना बसला असल्याने या गावांचा पोखरात समावेश झालेला नाही. आज रोजी ‘तेल ही गेले आणि तूप ही गेले, हाती धुपाटणे आले’ अशी म्हणण्याची वेळ खरोखर गरजू शेतकर्यांवर आली आहे.




