दीपनगरात केंद्रात सुरक्षा विभागातील कर्मचार्‍यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन


भुसावळ (25 ऑक्टोबर 2024) : दीपनगरातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगारांनी संविधानिक अधिकाराप्रमाणे शासन निर्णयानुसार त्यांच्या रास्त मागण्या केल्यास ठेका देणार नाही, अशा मनमानी पद्धतीची भूमिका दीपनगर व्यवस्थापनाने घेतल्याचा आरोप असून सुरक्षा विभागातील कंत्राटी कामगारांनी त्यांना महानिर्मिती आदेशाप्रमाणे भत्ते मिळावे, अशी मागणी केली होती. कामगारांवर दबाव निर्माण करून असंविधानिकरित्या लेखी घेण्यात आले. त्यानंतर ठेका देण्यात आला हा प्रकार संतापजनक आहे. या कामगारांना भत्ते देण्याबाबत महानिर्मिती मुख्य कार्यालय, मुंबई व सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी भत्ते देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहे. ते निर्णय नाकारण्याचा या प्रताप या अधिकार्‍यांनी झालेल्या बैठकीत केल्याने युनियनने पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात वाद विवाद झाला.

तर ठेका न घेण्याची भूमिका
सुरक्षा विभागातील मेस्को कामगारांना शासनाने निर्देशित केलेले भत्ते द्या, अन्यथा ठेका घेणार नाही. अशा पद्धतीची आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचा राग म्हणून व्यवस्थापनाने काही गरज नसताना 10 टक्क्े कामगार कपात केल्याने अनेक स्थानिक बेरोजगार उघड्यावर आले आहे. या सर्व प्रकरणी मंगळवारपासून मेस्को कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. ठेका बदलला तरी कामगार तेच राहतील, आम्ही दुसर्‍या एजन्सीला येथे काम करू देणार नाही. ही युनियनची स्पष्ट भूमिका राहील, असे आंदोलनकर्ते व राष्ट्रवादी ट्रेड युनियनचे अरुण दामोदर यांनी सांगितले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !