जळगावात उबाठा गटातर्फे जयश्री महाजनांना उमेदवारी
जळगाव (26 ऑक्टोबर 2024) : जळगावात भाजपाने आमदार राजूमामा भोळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे तूल्यबळ उमेदवार म्हणून कुणाला संधी मिळणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले होते मात्र जळगावची जागा उबाठा गटाकडे आली असून जयश्री सुनील महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना गटाने शनिवारी 15 मतदारसंघातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनिल गोटे, अजय चौधरी यांच्या उमेदवारीचा समावेश आहे. याचबरोबर ठाकरे गटाने कट्टर विरोधी नितेश राणे यांच्या विरोधातही उमेदवार उतरविला आहे.

धुळ्यात अनिल गोटे यांना उमेदवारी
धुळे शहरातून माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
असे आहेत मतदारसंघनिहाय ठाकरे गटाचे उमदेवार
1) धुळे शहर- अनिल गोटे
2) चोपडा (अज)- राजू तडवी
3) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
4) बुलढाणा- जयश्री शेळके,
5) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
6) हिंगोली- रूपाली राजेश पाटील
7) परतूर- आसाराम बोराडे
8) देवळाली (अजा) योगेश घोलप
9) कल्याण पश्चिम- सचिन बासरे
10) कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
11) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
12) शिवडी- अजय चौधरी
13) भायखळा- मनोज जामसुतकर
14) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
15) कणकवली- संदेश भास्कर पारकर.




