आमदार मंगेश चव्हाण उद्या विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार

50 हजारांवर जनतेची उपस्थिती : लाडक्या बहिणींच्या हस्ते भरणार अर्ज


चाळीसगाव (27 ऑक्टोबर 2024) : चाळीसगाव भाजपाचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचे समजते.

सकाळी निघणार रॅली
आमदार मंगेश चव्हाण यांच्या नामांकन रॅलीचे देखील नियोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होणार आहे तेथून पुढे जुने तहसील कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून गणेश रोड तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी मोठी रॅली काढण्यात येणार आहे.


लाडक्या बहिणींची असेल उपस्थिती
मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या हस्ते यावेळी आमदार मंगेश चव्हाण हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून महायुतीच्या नेत्यांची देखील यावेळी उपस्थिती असेल. आमदार चव्हाण यांनी प्रचारात देखील मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाणदेखील त्यांच्या बरोबरीने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
चाळीसगाव तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व नागरीक यावेळी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहणार आहेत. पन्नास हजारांहून अधिक मतदारांच्या हजेरीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून ही निवडणूक आता फक्त माझी एकट्याची नाही तर ही निवडणूक आता नागरिकांनी डोक्यावर घेतली आहे. म्हणून या ऐतिहासिक दिवशी मित्रपक्ष, नागरिक सर्वांनी सहभागी होऊन या दिवसाचे साक्षीदार बनावे, असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !