शरद पवार गटाच्या तिसर्या यादीत नऊ जणांना उमेदवारी
मुंबई (27 ऑक्टोबर 2024) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन यादीची घोषणा केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली व आता तिसरी नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
शरदचंद्र पवार पक्षातर्फे या उमेदवारांना संधी
1. करंजा – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट – अतुल वांदिले
3. हिंगणा – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
5. चिंचवड – राहुल कलाटे
6. भोसरी – अजित गव्हाणे
7. माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
8. परळी – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम
आरोप करणार्यांनाच सोबत घेण्याची वेळ
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना तिकिट दिलं नाही. याबद्दल जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, नवाब मलिक यांनी स्वत:च्या कन्येला भाजपकडून निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ भाजपने नवाब मलिकांना तिकीट देण्याऐवजी त्यांच्या मुलीला दिले आहे. नवाब मलिक यांच्यावर ज्यांनी आरोप केले, त्याच भाजपने त्यांना सोबत घेण्याची तयारी केलेली दिसते, असे जयंत पाटील म्हणाले.
तिसर्या यादीत बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परळी विधानसभा उमेदवारांचा समावेश आहे. यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीने मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उतरवले आहे. तर माजलगावमध्ये अजित पवार यांच्या आमदार प्रकाश सोळंके यांना मोहन जगताप टक्कर देणार आहेत तर अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांना अणुशक्तीनगर मधून उमेदवारी देण्यात आली आहे.