मुंबई-गोरखपूर, पुणे-दानापूर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वे धावणार !


Additional unreserved special trains will run between Mumbai-Gorakhpur, Pune-Danapur! भुसावळ (28 ऑक्टोबर 2024) : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मुंबई-गोरखपूर आणि पुणे-दानापूर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. यामुळे दिवाळीत प्रवाशांचा जागेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

असे आहे गाडीचे वेळापत्रक
मुंबई-गोरखपूर अनारक्षित विशेष गाडी चालविली जाणार आहे. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील. 01019 अनारक्षित विशेष गाडी 28 ऑक्टोबर रोजी मुंबई येथून दुपारी 2.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी गोरखपूर येथे रात्री 11 वाजता पोहोचणार आहे तर परतीच्या प्रवासात 01020 अनारक्षित विशेष गाडी 30 ऑक्टोबर रोजी गोरखपूर येथून रात्री 12.45 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी मुंबई येथे सकाळी 10.35 वाजता पोहोचणार आहे.. ही गाडी दादर, ठाणे,कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा आणि बस्ती येथे थांबणार आहे. या गाडीला 17 डबे असतील.

पुणे-दानापूर अनारक्षित गाडी (दोन फेर्‍या)
प्रवाशांची गर्दी पाहात पुण्यातून दानापूरसाठी विशेष अनारक्षित गाडी चालविली जाणार आहे. यावेळी 01419 अनारक्षित विशेष गाडी 28 ऑक्टोबर रोजी पुणे येथून सकाळी 10. 50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दानापूरला रात्री 9.30 वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात 01420 अनारक्षित विशेष गाडी 29 ऑक्टोबरला दानापूर येथून रात्री 11.50 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी पुण्यात सकाळी 9.55 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, नगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबणार आहे. यागाडीला 21 डबे असतील. या गाड्यांचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.