भुसावळात महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन : आमदार संजय सावकारे यांच्या रॅलीला सुरूवात


गणेश वाघ

Strong show of strength of Mahayuti in Bhusawa : MLA Sanjay Savkare’s rally begins भुसावळ (28 ऑक्टोबर 2024) : भुसावळात भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीला सोमवारी सकाळी 10.30 वाजता जामनेर रोडवरील दर्डा भवनापासून सुरूवात झाली आहे. शहर व ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले आहेत. सजवलेल्या रथावर मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी आदी उपस्थित आहेत.


हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग
आमदार सावकारे हे सोमवार, 28 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. तत्पूर्वी जामनेर रोडवरील दर्डा भवनापासून त्यांच्या विराट शक्ती प्रदर्शन रॅलीला सुरूवात झाली. शहरासह ग्रामीण भागातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले आहेत.

भाजपेयींमध्ये उत्साह : ढोल-ताशांच्या गजरात नृत्य
आमदार सावकारे यांच्या नामांकनापूर्वी शहरात शक्ती प्रदर्शन रॅलीला सुरूवात झाली असून अग्रभागी भजनी मंडळ व त्यानंतर ढोल-ताशांचा गजर सुरू असून माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचंड उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करीत आहेत तर महायुतीतील विविध घटक पक्षांचे ध्वज घेवून कार्यकर्तेही प्रचंड उत्साहात या रॅलीत सहभागी झाले आहेत. जामनेर रोड कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलला असून काही वेळेसाठी वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !