वरणगाव ऑर्डनन्समधून चोरलेल्या तीन रायफल्स जाडगावजवळ रेल्वे रूळावर आढळल्या

वरणगाव पोलिसांकडून शस्त्र : प्रकरण अंगाशी येत असल्याने संशयीताने कृत्य केल्याचा संशय


Three rifles stolen from Varangaon Ordnance were found on railway tracks near Jadgaon भुसावळ (28 ऑक्टोबर 2024) : वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणार्‍या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणार्‍या तीन एके-47 रायफल्ससह दोन अत्याधूनिक गलील रायफल्स अज्ञात चोरट्यांनी 19 ते 21 दरम्यान लांबवल्याने देशभरात खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांचा 24 तास खडा पहारा असताना हा प्रकार घडला होता. वरणगाव पोलिसांकडून व समांतर यंत्रणेकडून या ुगुन्ह्याचा तपास सुरू असताना जाडगाव रेल्वे लाईनवर सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तीन शस्त्र सापडल्याची घटना समोर आली.

संशयीतांचा कसून शोध
पोलीस यंत्रणेकडून रायफल चोरीचा कसोशीने तपास सुरू असताना संशयीतांना प्रकरणात अंगाशी येत असल्याची भीती वाटल्याने त्यांनी जाडगावनजीक शस्त्र तर फेकले नाही ना ? अशी शंका आहे.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, वरणगावचे सहा.निरीक्षक जनार्धन खंडेराव, उपनिरीक्षक सोनवणे, जवरे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत दोन एके 47 व एक गलील रायफल जप्त केली.


कॉपी करू नका.