भुसावळात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार
भुसावळ (28 ऑक्टोबर 2024) : भुसावळ विधानसभेची जागा काँगे्रसा सुटल्यानंतर शहरातील प्रथितयश हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राजेश मानवतकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. डॉ.मानवतकर यांनी यापूर्वी भुसावळ शहर व तालुक्याचा मतदारसंघ पिंजून काढला असून उद्या मंगळवार, 29 रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
प्रचार कार्यालयाचे होणार उद्घाटन
मंगळवार, 29 रोजी जामनेर रोडवरील नवशक्ती आर्केडजवळील उमेदवाराच्या संपर्क/प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी सकाळी 9.30 वाजता होणार आहे. यानंतर ढोल-ताशांचा गजरात व जनतेला अभिवादन करीत डॉ.राजेश मानवतकर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होतील.

शहरवासीयांना उपस्थितीचे आवाहन
रॅलीत राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार दिलीप भोळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, अॅड.राजेश झाल्टे, भीमशक्ती संघटनेचे सुधीर जंजाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख, महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील. सहभागाचे आवाहन भुसावळ काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, भीमशक्तीचे सुनील जोहरे, अजय दामू पाटील, प्रा.जतीन मेढे आदींनी केले आहे.




