निवडणुकीच्या धामधूमीत सातबारा उतार्यासाठी दोन हजारांची लाच भोवली : पिंपळस तलाठी एसीबीच्या जाळ्यात
नाशिक (28 ऑक्टोबर 2024) : सातबारा उतार्यावर तक्रारदारासह त्याच्या पत्नीचे नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना पिंपळस (रामाचे) अतिरिक्त कार्यभार तलाठी सजा- जळगाव तालुका निफाड आसीफ अनिस पठाण (52) यास नाशिक एसीबीने अटक केली.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांनी मौजे जळगाव तालुका निफाड येथे व्यापारी गाळा विकत घेतला असून त्याचा फेरफार करून सदर फेरफारची नोंद मंडळ अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घेऊन सातबारा उतार्यावर तक्रारदार यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव लावून देण्याच्या मोबदल्यात यातील लोकसेवक पठाण यांनी 25 रोजी तीन हजार लाच मागितली व दोन हजार स्वीकारण्याचे कबुल करताच सापळा रचण्यात आला. 28 रोजी लाच स्वीकारताच तलाठ्याला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात निफाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस निरीक्षक मीरा वसंतराव आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.