विधानसभेसाठी भाजपची चौथी यादी जाहीर : ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी
मुंबई (29 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत भाजपाने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस आहे मात्र शेवटच्या दिवसापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू असून ज्या जागांवर तोडगा निघत आहे, तेथील उमेदवार राजकीय पक्षांकडून जाहीर केले जात आहेत.
या दोन उमेदवारांना संधी
भाजपने उमरेड विधानसभा मतदारसंघातून सुधीर पारवे यांना उमेदवारी दिली असून मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांना रिंगणात उतरवलं आहे. भाजपने आतापर्यंत 148 उमेदवार जाहीर करत चार जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. यासह भाजप आतापर्यंत 152 जागांवर पोहोचला आहे.
भाजपने बडनेराची जागा युवा स्वाभिमानीला, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिना-मुंबईची जागा रिपब्लिकन पक्षाला तर शाहुवाडीची जागा जनसुराज्य पार्टीला सोडली आहे. बडनेरामध्ये रवि राणा, गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे, तर शाहुवाडीत विनय कोरे हे उमेदवार असतील.