खासदार संजय राऊत कडाडले : विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदें कर्मचारी फळे भोगावीच लागतील


MP Sanjay Raut lashed out: Eknath Shinde employees will have to bear the fruits after the assembly elections मुंबई (29 ऑक्टोबर 2024) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका करीत विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना कर्माची फळे भोगावी लागतील, असे म्हटले आहे. वनगा कुटुंबाला भाजपने वार्‍यावर सोडल्याचेही ते म्हणाले. पालघर मतदारसंघातील आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले आहेत. यावर राऊत यांनी निशाणा साधला.

शिंदे यांना कर्माची फळे भोगावी लागणार
खासदार राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हे देव माणूस आहेत. त्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. ते देव माणूस आहेतच, त्यामुळे तुम्हाला ते सांगण्याची आवश्यकता नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वनगा यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांना देखील त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

वनगा नॉट रिचेबल
वनगा हे पालघर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांना उमेदवारी न देता दुसरा उमेदवार दिला आहे त्यामुळे वनगा नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात सध्या आत्महत्या करण्याचा विचार येत असल्याचे त्यांच्या पत्नीने काल म्हटले होते. त्यातच वनगा हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे.


कॉपी करू नका.