जळगाव विधानसभेच्या आखाड्यात डमी उमेदवार जयश्री महाजन यांच्यासह तिघांची माघार
जळगाव (30 ऑक्टोबर 2024) : जळगाव शहर विधानसभेच्या आखाड्यात यंदा प्रचंड चुरशीची लढत होणार आहे. भाजपा आमदाराविरोधात महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी दंड थोपटून प्रचार जोमाने सुरू केला आहे मात्र उमेदवारी दाखल करताना जयश्री महाजन नावाच्या अन्य दोन उमेदवारांनी ही अर्ज भरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती मात्र त्यातील एका जयश्री सुनील महाजन या उमेदवाराने माघारीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी माघार घेतली.
जळगावात या उमेदवारांची माघार
निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, जयश्री सुनील महाजन (फैजपूर, ग्रामीण), सीमा सुरेश भोळे (जळगाव), डॉ.शांताराम तोताराम सोनवणे (जळगाव) यांनी गुरुवारी आपली उमेदवारी मागे घेतली.

जळगावात जबरदस्त चुरशीची निवडणूक होणार
जळगाव शहर मतदार संघांत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा संधी मिळाली तर त्यांच्या उमेदवारीला माजी महापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी आव्हान देत अपक्ष अर्ज दाखल केला व महाविकास आघाडीतर्फे माजी महापौर तथा शिवसेना उबाठा गटाच्या जयश्री सुनील महाजन यांनाही उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे. जळगावात माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला असून अन्य अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात असल्याने येथे चुरशीची निवडणूक होईल, यात शंकाच नाही.




