पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात दहा सभा : धुळे व नंदुरबारमध्ये 8 रोजी सभा


मुंबई (2 नोव्हेंबर 2024) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात दहा सभा घेणार आहेत. एकावेळी किमान 15 ते 20 उमेदवारांच्या प्रचार सभेचे नियोजन असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. 8 नोव्हेंबर रोजी धुळे व नंदुरबार, 9 नोव्हेंबर रोजी अकोला व नांदेड येथे सभा होईल. 12 नोव्हेंबरला चंद्रपूर व चिमूर, सोलापूर आणि पुणे, 14 नोव्हेंबर : संभाजी नगर व मुंंबईत सभा होईल. आहे.

परदेश दौर्‍यापूर्वी सभेचे नियोजन
पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जास्तीत-जास्त सभा घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट या अन्य दोन घटक पक्षांनीही केली आहे. पंतप्रधान मोदी यांचा 14 नोव्हेंबरनंतर परदेश दौरा असल्याने त्यापूर्वी त्यांच्या प्रचारसभा राज्यात करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे.

मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रत्येकी 15-20 सभा होणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 50 हून अधिक प्रचारसभा राज्यात घेणार आहे.


कॉपी करू नका.