रावेर विधानसभेतील महायुतीचे उमेदवार अमोल जावळेे उद्या फैजपूरातून करणार प्रचाराचा शुभारंभ


फैजपूर (3 नोव्हेंबर 2024) : रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे तरुण उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे हे आपल्या प्रचाराचा शुभारंभ सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 रोजी फैजपूर येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान, फैजपूर या ऐतिहासिक ठिकाणापासून करणार आहेत. प्रचाराची सुरुवात सकाळी 9.30 वाजता केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आणि पाच लाडक्या बहिणींच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या उद्घाटनानंतर, फैजपूर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

फैजपूरातून निघणार प्रचार रॅली
भाजपाने या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचे माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे सुपूत्र अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विविध सामाजिक कार्यासह रुग्णसेवेच्या माध्यमातून अमोल जावळे यांचा यापूर्वीपासूनच मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. त्यातच आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते अधिक जोमाने कामाला लागले आहे. महायुतीतील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्यांची प्रचार रॅली सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे.


रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !