भुसावळात वंचित आघाडीचे उमेदवार जगन्नाथ सोनवणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

जगन सोनवणे यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे मान्यवरांचे आवाहन


Inauguration of campaign office of Vanchit Aghadi candidate Jagannath Sonawane in Bhusawal भुसावळ (3 नोव्हेबर 2024) : जनसामान्यांच्या हक्कासाठी लढवय्या नेता म्हणून जगन्नाथ देवराम (जगनभाई) सोनवणे यांची ओळख आहे. अर्ध्या रात्री नागरिकांच्या मदतीला ते धावून जातात शिवाय आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची शहर व तालुकावासीयांना ओळख आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या पाठीमागे सर्वांनी ताकदीने उभे राहून त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन वंचित आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पक्षाच्या मान्यवर पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी केले.

ढोल-ताशांचा गजरात कार्यालयाचे उद्घाटन
जामनेर रोडवर अ‍ॅक्सीस बँकेसमोर वंचित आघाडीचे उमेदवार जगन्नाथ (जगनभाई) सोनवणे यांच्या प्रचार व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी मान्यवर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांचा जोरदार गजर करण्यात आला.


भुसावळ विधानसभेत बदल घडणार !
मान्यवरांनी जगन सोनवणे या विधानसभा निवडणुकीत निश्चित बदल घडवतील असा विश्वास व्यक्त करीत त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी वंचितचे उमेदवारी जगनभाई सोनवणे, माजी नगरसेविका पुष्पा सोनवणे, राकेश बग्गन, हरिष सुरवाडे, जागृती जगन सोनवणे, गणेश इंगळे, संतोष बाविस्कर, वंदना सोनवणे, युवराज इंगळे, प्रमोद बाविस्कर, अरुण नरवाडे, विक्रम वानखेडे, महेश सोनवणे, शेख अशपाक यांच्यासह वंचित आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !