मोठी बातमी : रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून बदली


Rashmi Shukla has been transferred from the post of Director General of Police मुंबई (4 नोव्हेंबर 2024) : काँग्रेससह विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतरा राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने खळबळ उडाली आहे. तीन वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे उद्यापर्यंत पाठवावेत, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव यांना आयोगाने दिले आहेत.

फोन टॅपिंगमुळे रश्मी शुक्ला चर्चेत
फोन टॅपिंगमुळे विरोधकांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केले होते. मुदत संपूनही रश्मी शुक्ला यांना दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवावं, अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात होती. याबाबत विरोधकांनी केंद्रीय निवडणूक अधिकार्‍यांचीही भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात निष्पक्षपणे निवडणूक पार पडणार नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.

नाना पटोले म्हणाले, निवडणूक पदावर नका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, निवडणूक प्रक्रियेत त्या सहभागी होणार नाहीत याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्याचे स्वागत आहे. निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी सत्ताधार्‍यांनी त्यांना या पदावर बसवलं होते. निवडणूक आयोगाकडे आम्ही याबाबत तक्रार केली होती. झारखंड, पश्चिम बंगाल याठिकाणी महासंचालक बदलले मात्र इतका वेळ निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला का लागला हा प्रश्न आहे ? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


कॉपी करू नका.