जळगावात बंडखोरी रोखण्यात महायुतीसह महाविकास आघाडीला अपयश
Failure to lead the Mahayavi with Mahayuti to prevent rebellion in Jalgaon जळगाव (4 नोव्हेंबर 2024) : जळगाव विधानसभा निवडणुकीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. बंडखोरांना थांबविण्यात महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्पष्टपणे अपयश आल्याने जळगावातील निवडणूक आता मोठी रंगतदार व चुरशीची होईल यात शंकाच नाही.
संकटमोचकांची जादू चाललीच नाही
राज्यातील भाजपाचे संकट मोचक व मंत्री गिरीश महाजन यांची जादू जिल्ह्यात भाजपाच्या बंडखोरांवर चाललेली नाही. एकही ठिकाणी बंडखोरांनी माघारी घेतलेली नाही. परिणामी जळगाव जिल्ह्यात संकट मोचक संकटात आल्याचे बोलले जात आहे. जेथे-जेथे बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे त्या ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे राहिले आहे.

बंडखोरीमुळे जळगावात अधिक चुरस
महायुतीतील बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजनांवर होती मात्र त्यांना बंडखोरी थांबवण्यात अपेक्षित यश आलेले नाही. जळगाव शहरातील नगरसेवक अश्विन सोनवणे यांनी माघार घेतली नसल्याने ते षड्डू ठोकून आता पूर्णपणे रिंगणात उतरले आहे त्यामुळे येथे आणखीन चुरस निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीतही बंडखोरी
जळगावात उबाठाचे कुलभूषण पाटील यांनीदेखील बंडखोरी करीत अर्ज कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील आवाहन केल्यानंतर उपयोग झालेला नाही.




