पुण्यात अपक्ष उमेदवाराने निवडणूक अधिकार्‍याची गाडी पेटवली


An independent candidate in Pune burned the election officer’s car पुणे (4 नोव्हेंबर 2024) : पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक ाबातमी समोर आली आहे. दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांनी शासकीय कार्यालयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. काळेवाडी पोलिसांनी याप्रकरणी विनायक ओव्हाळ यांना ताब्यात घेतले असून गाडी पेटवण्यामागील स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

घर मिळाले नाही, रसवंतीस दिली नाही परवानगी
आग लावण्याच्या प्रकारानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न का केला, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. उमेदवारी अर्जाबाबत दोघांमध्ये काही वाद झाला होता का, याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करून ही रमाई आवास योजनेत घर मिळालं नाही, रसवंती आणि फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात कॅन्टीनला लावण्याची परवानगी दिली नाही, यामुळं ओव्हाळ यांनी गाडी पेटवून दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेत विनायक ओव्हाळ यांच्यासोबत नागेश काळे आणि अजय गायकवाड हे आणखी दोघे उपस्थित होते. काळे सुद्धा दिव्यांग असून त्यांच्याच रिक्षातून ओव्हाळ हे प्रभागात आले होते. त्याचवेळी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.


कॉपी करू नका.