भुसावळ विधानसभा मतदारसंघात सात अपक्षांची माघार ; नऊ उमेदवार रिंगणात
Seven independents withdrawn in Bhusawal assembly constituency भुसावळ (4 नोव्हेंबर 2024) : भुसावळ विधानसभा मतदारसंघा सात अपक्षांनी माघार घेतल्यानंतर नऊ उमेदवार रिंगणात असून बुधवारपासून प्रचाराला आता अधिकच जोर येणार आहे.
सात अपक्षांची माघार
मंगळवारी माघारीचा अखेरचा दिवस असल्याने माघारीकडे लक्ष लागून होते. दुपारी तीन वाजेपर्यंत सात अपेक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यात शैलेश प्रभाकर बोदडे, पुष्पा जगन्नाथ सोनवणे, प्रशांत मनोहर तायडे, भूपेश विश्राम बाविस्कर, अॅड.प्रवीण नाना सुरवाडे, शेख रहिम शेख अहमद, रवींद्र बळीराम सपकाळे या उमेदवारांचा समावेश आहे.

चार प्रमुख पक्षांसह नऊ उमेदवार रिंगणात
रिंगणातील उमेदवारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय वामन सावकारे, काँग्रेसचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर, बहुजन समाज पार्टीचे राहुल नारायण बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जगन देवराम सोनवणे तसेच अपक्ष अजय जीवराम इंगळे, गौरव धनराज बाविस्कर, प्रतिभा सुजीत जगदाळे, सुशील ज्ञानेश्वर मोरे, स्वाती कुणाल जंगले यांचा समावेश आहे.




