पिंपरी चिंचवड हद्दीत खून : रेल्वेने पसार होत असलेल्या आरोपीला भुसावळ रेल्वे स्थानकावर बेड्या

बिर्याणी घेण्यासाठी उतरताच रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची कारवाई


भुसावळ (5 नोव्हेंबर 2024) : पुण्यातील देहू रोड पोलीस ठाणे हद्दीत रात्री दरवाजा वाजवल्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर दोघांनी मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला होता. या गुन्ह्यातील संशयीत साप्ताहिक एलटीटी-दानापूर एक्स्प्रेसने गावाकडे पसार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भुसावळात रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या रविवारी रात्री 8.30 वाजता मुसक्या आवळल्या. जय प्रकाश सदाय (21, गंगापूर, मधुबनी, बिहार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपी रेल्वे स्थानकावर बिर्याणी घेण्यासाठी उतरताच त्यास व अन्य सोबतच्या दोन मित्रांनाही ताब्यात घेण्यात आले व त्यांना देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरवाजा वाजवल्याच्या वादातून खून
राजश्री पॅकेजिंग कंपनीतील मशीन ऑपरेटर प्रमोद मोहित यादव (विठ्ठलवाडी, तळवडे हॉस्पीटलजवळ, देहुगाव, ता.हवेली, जि.पुणे) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ अमोदकुमार मोहित यादव यांच्यासह देहुगावाजवळ वास्तव्यास होते. 1 रोजी रात्री अमोलकुमार यादव हा मित्र कमलेशकुमार यादवच्या घरी जेवणासाठी गेल्यानंतर रूमचा पत्रा कुणीतरी विचारल्यानंतर जाब विचारल्यानंतर संशयीत जयप्रकाश सदय व भोगींदर सदय यांनी वाद घालून ठार मारण्याची धमकी दिली व नंतर रात्री 12.30 वाजता एसएमडी कंपनीसमोर संशयीतांनी लाकडी दांडक्याने डोक्यात व पाठीत मारल्याने अमोदकुमारचा मृत्यू ओढवला. त्यानंतर संशयीत आरोपी जयप्रकाश सदय व भोगींदर सदय हे पसार झाले.

भुसावळात संशयीत उतरताच आवळल्या मुसक्या
01143 डाउन एलटीटी-दानापूर साप्ताहिक एक्स्प्रेसने संशयीत जयप्रकाश सदय हा रविवारी पसार होत असल्याची माहिती भुसावळात यंत्रणेला कळवल्यानंतर भुसावळ लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयीतांचा शोध सुरू केला व संशयीत बिर्याणी घेण्यासाठी खाली उतरला यावेळी यंत्रणेने मिळाललेया फोटोद्वारे खात्री केल्यानंतर त्याच्या मुसक्या बांधल्या शिवाय संशयीताचे दोन मित्र यांनाही ताब्यात घेण्यात आले. देहूरोड पोलिसांना सूचित केल्यानंतर त्यांनी संशयीताचा ताबा घेतला.

यांनी आवळल्या मुसक्या
आरपीएफचे उपनिरीक्षक एन.के.सिंह, एएसआय दीपक कव्हले व स्टाफ, सीडीपीएस टीम, एएसआय दीपक तायडे व स्टाफ, भुसावळ लोहमार्गचे सहाय्यक निरीक्षक किसन राख, हवालदार दिवाणसिंग राजपूत, कॉन्स्टेबल बाबू मिर्झा, शहर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल भंडारे, एसआयपीएफचे संजय पाटील आदींनी ही कारवाई केली.


कॉपी करू नका.