मुक्ताईनगर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार


बोदवड (5 नोव्हेंबर 2024) : बोदवड-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर राजूर गावात प्रचार दौर्‍यादरम्यान मंगळवारी गोळीबार झाल्याची घटना घडल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रचार दौर्‍यादरम्यान गोळीबार
मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी सकाळी विनोद सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली. प्रचार दौरा बोदवड तालुक्यात सुरू झाल्यानंतर बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबारात कुणालाही दुखापत झालेली नाही.

विनोद सोनवणे पोलीस ठाण्यात
गोळीबाराच्या घटनेनंतर विनोद सोनवणे हे बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले असून त्यांच्याकडून यंत्रणा घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेत आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक अरविंद भोळे म्हणाले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी भेट दिली व उमेदवाराकडून घडल्या प्रकाराची सखोल माहिती जाणल्यानंतरच याबाबत सांगता येईल.

(ही बातमी आम्ही लवकरच सविस्तर अपडेट करू)


कॉपी करू नका.