भुसावळातील गणेश बोरे एक वर्षांसाठी हद्दपार : प्रांताधिकार्‍यांचे आदेश


Ganesh Bore in Bhusawal Deported for one year : Order of Provincial Commissioner भुसावळ (6 नोव्हेंबर 2024)  : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून स्थानिक प्रांताधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर भुसावळातील जळगाव रोडवरील मथुरा अपार्टमेंट मधील रहिवासी गणेश मारूती बोरे यांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या संदर्भातील प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी काढल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सादर केला प्रस्ताव
गणेश बोरे विरोधात गुन्हे दाखल असून त्यानंतर त्याच्या मनात कायद्याचा धाक नसल्याने शहर पोलीस प्रशासनाने हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविला होता. तो प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे आल्यानंतर बोरे यांचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी गणेश मारोती बोरे यास एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले.

बोरे जेथेही जातील तेथील पोलीस ठाण्यात त्यांनी नाव नोदणी करून दर महिन्याला तेथे हजेरी लावावी, असे आदेशात नमूद आहे. बोरे विरूध्द शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


कॉपी करू नका.