भुसावळात दोन महिलांनी सराफा दुकानातून सव्वा लाखांची सोन्याची चैन लांबवली


भुसावळ (8 नोव्हेंबर 2024) : दागिणे घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी शहरातील सराफ बाजारातील पी.एम.ज्वेलर्स दुकानातून 22 कॅरेटची व एक लाख 18 रहजार 660 रुपयांची सोन्याची चैन लांबवली. ही घटना 25 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी येथील बाजारपेठ पोलिसात चोरीचा गुन्हा बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी रात्री दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
25 ऑक्टोबर रोजी पी.एम.ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात सोन्याचे दागिणे पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी दागिणे न्याहाळताना 22 कॅरेटची एक लाख 18 हजार 660 रुपये किंमतीची सोन्याची साखळी लांबवली. बाजारपेठ पोलिसात पियुष मोहनलाल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महिलांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्या महिलांचा शोध सुरू करण्यात आला आहे.


कॉपी करू नका.