20 हजारांची लाच भोवली : शिरसोलीतील लाचखोर वायरमनला एसीबीकडून कारवाईचा ‘शॉक’
जळगाव (8 नोव्हेंबर 2024) : घर बांधकामाची साईट बांधून पूर्ण झाल्यानंतर वीज कनेक्शन देण्यासाठी सुरूवातीला दहा हजार स्वीकारल्यानंतर दुसर्यांदा पुन्हा 20 हजार रुपयांची मागणी करीत लाच स्वीकारणार्या शिरसोली येथील वायरमन व वरिष्ठ तंत्रज्ञ विक्रांत अनिल पाटील उर्फ देसले (38, माऊली नगर, जळगाव) यास जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने यशस्वी केला.