ऐतिहासीक नगरी फैजपूरात उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा

महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन


फैजपूर (9 नोव्हेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा रविवार, 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता फैजपूर शहरातील जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मैदान, फैजपूर-हंबर्डी, बर्‍हाणपूर-अंकलेश्वर हायवेवरील साखर कारखान्याजवळ आयोजित करण्यात आली आहे.

महायुतीच्या उमेदवारांसह मंत्र्यांची उपस्थिती
रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, तसेच जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.