शेगडी पेटवताना आग लागून जखमी झालेल्या महेलखेडीतील महिलेचा मृत्यू


यावल (10 नोव्हेंबर 2024) : यावल तालुक्यातील महेलखेडी गावात 48 वर्षीय महिला आपल्या घरात स्वयंपाक करत असताना शेगडी पेटवतांना शेगडीने भडका घेतला आणि महिलेच्या कपड्यांना आग लागली. यात महिला जबर जखमी झाली. तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालय व नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अचानक उडाला भडका
महेलखेडी गावात शोभा सोपान तायडे (48) ही महिला आपल्या घसरात स्वयंपाक करत रम्यान स्वयंपाकासाठी शेगडी पेटवली असता शेगडीने भडका धरला आणि यात महिलेचे कपडेदेखील जळाले. बघता-बघता आगीने रुद्रावतार घेतला आणि महिला मोठ्या प्रमाणावर जळाली. हा प्रकार निदर्शनास येताच महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालय नंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात व नंतर खाजगी रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.