विरोधकांना देशाच्या सुरक्षेशी देणे घेणे नाही मात्र आम्ही सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवला : अमित शहा

फैजपूर शहरात महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारसभा


फैजपूर (10 नोव्हेंबर 2024) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिद्धांतांवर चालणारे आपले केंद्र व राज्यातील सरकार आहे. कलम 370 आम्ही हटवला व सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवला आहे पण विरोधकांना देशाच्या सुरक्षेचे काहीही पडलेले नाही, अशी टीका केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी फैजपूरातील सभेत केले. महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी त्यांची फैजपूरात प्रचार सभा झाली.

महायुतीला विजयी करण्याचे आवाहन
केंद्रात नरेंद्र भाई मोदी यांचे सरकार असून महाराष्ट्रातही गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या महायुती सरकारने खूप चांगले काम केले असून विकासाची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी पुन्हा महायुती सरकारला विजयी करा, असे आवाहन अमित शहा यांनी केले. महायुतीचे रावेर मतदारसंघाचे उमेदवार अमोल जावळे, भुसावळचे उमेदवार संजय सावकारे, चोपड्याचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत शहा बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे व पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.